“चेक बाऊन्स’ प्रकरणी त्वरित कारवाईचे विधेयक मंजूर

नवी दिल्ली – “चेक बाऊन्स’ प्रकरणी वेगाने कारवाई करण्याबाबत न्यायालयाला परवानगे देणारे विधेयक संसदेमध्ये मंजूर झाले. या विधेयकानुसार धनादेश देणाऱ्या व्यक्‍तीला रकमेच्या 20 टक्के एवढ्या रकमेची नुकसान भरपाई देखील द्यावी लागणार आहे.

सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यापासून 60 दिवसांच्या आत ही नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. यासंबंधीचे दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये 23 जुलै रोजी मंजूर झाले होते. राज्यसभेमध्ये आवाजी मतदानाने त्यास मंजूरी दिली गेली.
सध्या देशातल्या कनिष्ठ न्यायालयांमध्ये “चेक बाऊन्स’ची 16 लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. यातीलच 34 हजार प्रकरणांचे अपील उच्च न्यायालयामध्ये आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धनादेश देणाऱ्या व्यक्‍तीवरील विश्‍वास आणि यंत्रणेवरील श्रद्धा कायम रहावी यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्यात येत आहे, असे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री शिव प्रताप शुक्‍ला यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले. “चेक बाऊन्स’ प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असावी, हा गुन्हा अजामीनपात्र असावा अशा सूचना राज्यसभेतील सदस्यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)