चीन भारतात ई वाहनांची निर्यात करणार 

नवी दिल्ली: सनरा ही चीनमधील ई वाहनांची कंपनी भारतात आपला प्रकल्प स्थापन करण्याचा विचार करत आहे. भविष्यात भारतातील ई वाहनांची वाढती बाजारपेठ पाहता बेंगळुरमध्ये प्रकल्प उभारण्यास आपली इच्छा व्यक्त केली आहे. या कंपनीकडून ई बाईक आणि त्यांचे सुटे भाग भारतासह 70 देशांत निर्यात केले जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ई वाहनांसंबंधित असलेले धोरण पाहता कंपनीने भारतात प्रकल्प उभारण्यासाठी इच्छुक असल्याचे सनराचे महाव्यवस्थापक व्हिक्‍टर लु यांनी सांगितले. भारतातील ई वाहनांची मागणी पाहता पुढील चार ते पाच वर्षात चीनला मागे टाकण्याची शक्‍यता आहे.
ई बाईकमध्ये भारत सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून समोर येत आहे. दिल्ली आणि अन्य ठिकाणी प्रदूषण वाढत असल्याने ई बाईक वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. कंपनीचे दिल्लीमध्ये 16 भागीदार आहेत. सध्या भारतात 6 ई बाईक मॉडेलची चाचणी घेण्यात येत आहे, असे त्यांनी म्हटले. सध्या कंपनीकडून बॅटरी, अन्य सुट्या भागांची भारतात निर्मिती करण्यात येत असून ती अल्प प्रमाणात आहे. ती वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)