चीन-जपान युद्‌धात बुडालेल्या जहाजाचा 125 वर्षांनी शोध

बीजिंग (चीन) – चीन आणि जपान यांच्यातील युद्‌धात बुडालेल्या एका जहाजाचे अवशेष पुरातत्त्व शास्त्रज्ञांना सापडले आहेत. 125 वर्षापूर्वी चीन-जपानमधील नौकायुद्‌धात जिंगयुवान नावाच्या लढाऊ जहाजाला जलसमाधी देण्यात आली होती. या जहाजाचा शोध पुरातत्त्व शास्त्रज्ञ दीर्घ काळापासून करत होते. अखेर याचे अवशेष चीनच्या सागरकिनारी 12 मीटर खोलीवर सापडले आहेत.

चीन आणि जपान यांच्यात झालेल्या युद्धात 1894 साली इतर तीन जहाजांबरोब जिंगयुवानही हे जहाज बुडाले होते. पुढे चीन-जपानचे हे युद्ध 1912 सालापर्यंत चालू होते. जर्मनीच्या वलकन गोदीत जिंगयुवानची निर्मिती करण्यात आली होती आणि 19 व्या शतकाच्या आठव्या दशकात त्याचा चिनी आरमारात समावेश करण्यात आला होता.
पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी जिंगयुवानमधून चिनी मातीची भांडी, चामड्याच्या वस्तू, शस्त्रे आणि बंदुकीच्या गोळ्यांसह सुमारे 500 अवशेष जिंगयुवानमधून बाहेर काढले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक नौसेनेच्या अभ्यासाच्य दृष्टीने जिंगयुवानचे मिळालेले अवशेष महत्त्वपूर्ण असल्याचे मत तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)