चीनी बॅंकांना 717 दशलक्ष डॉलर द्यावेत; ब्रिटनच्या न्यायालयाचा अनिल अंबानी यांना आदेश

लंडन- रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी चीनच्या तीन बॅंकांना त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जापोटी 21 दिवसाच्या आत 717 दशलक्ष डॉलर द्यावेत असा आदेश ब्रिटनमधील न्यायालयाने दिला आहे.

संबंधित कर्जाला अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली असल्यामुळे त्यांनी ही रक्कम इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बॅंक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बॅंक आणि एक्‍झिम बॅंक ऑफ चायना या तीन बॅंकांना द्यावी असे न्यायालयाने सांगितले. यावर प्रतीक्रीया देतांना रिलायन्स समुहाने म्हटले आहे की, आम्हाला न्यालयाच्या निकालाच्या प्रतीची प्रतिक्षा आहे.

त्यानंतर समुह या विषयावर आपली प्रतिक्रीया व्यक्त करणार आहे. या समुहातील बऱ्याच कंपन्या सध्या आर्थिक अडचणीत आल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×