चीनसोबत संतुलित प्रमाणात व्यापार करणार – सुरेश प्रभू 

तांदूळ आणि औषधांची निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न
मुंबई: चिनी वस्तूंची भारतातील आयात सातत्याने वाढत असताना त्या तुलनेत निर्यात खूप कमी आहे. यासाठी चीनशी संतुलित व्यापार करण्याचे धोरण आखले जात आहे. प्रामुख्याने भारतीय तांदूळ व येथे उत्पादित होणाऱ्या औषधांची चीनला निर्यात करण्यासंबंधी अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
भारतात देशनिहाय विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) उभे करण्याबाबत जपान, कोरिया व रशियातील कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. या कंपन्या येथे कारखाना सुरू करतील व जगभरात वस्तूंची निर्यात करतील, असे त्यांनी सांगितले.
देशभरात आणखी 55 हजार बनावट कंपन्या असल्याचे समोर आले आहे. त्या कंपन्यांच्या संचालकांची संपत्ती गोठविण्याचे आदेश संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत, अशी माहिती कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांनी दिली. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक परिषदेनंतर ते बोलत होते. नोटाबंदीदरम्यानचा तपास अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांमध्ये अमेरिकेची गुंतवणूक 
देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात अमेरिकन कंपन्या गुंतवणूक करण्यास तयार आहेत. पण भारतीय बॅंकांकडून वित्त साहाय्य घेण्यात अडचणी असल्याचे मत परिषदेत व्यक्‍त करण्यात आले. अमेरिकेचे भारतातील दूत केनेथ जस्टर, आयएसीसीचे माजी अध्यक्ष नानी रुपानी, पश्‍चिम क्षेत्र प्रमुख मधुलिका गुप्ता आदी या वेळी उपस्थित होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)