चीनमध्ये दोन नौका उलटून 17 जणांचा मृत्यू

बीजिंग : चीनमध्ये शर्यतीच्या सरावात सहभागी झालेल्या दोन नौका नदीत उलटल्या. दरम्यान, या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना गुआंगशी झुआंग स्वायत्त क्षेत्रात घडली. स्थानिक सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने याबद्दलची माहिती दिली. दुर्घटनेप्रकरणी स्पर्धेच्या दोन आयोजकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांना कल्पना न देताच या नौका शर्यतीच्या सरावासाठी जात होत्या. एक नौका नदीच्या वेगवान प्रवाहात अडकून बुडाली. यानंतर मागून येणारी दुसरी नौका देखील त्याच ठिकाणी येत उलटली. नदीचे दोन प्रवाह एकत्र आल्याने पाण्याचा प्रवाह वेगवान असणाऱ्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत बळी पडलेल्या बहुतेकांनी लाइफजॅकेट परिधान केले नव्हते. सुमारे 200 जण मदत आणि बचावकार्यात सहभागी झाले. बचाव मोहिमेत 40 जणांना वाचवण्यास यश आल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)