चीनमध्ये असे स्वागत होणारा मी भारताचा पहिला पंतप्रधान -मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चीनच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अनौपचारिक भेट घेतली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी,चीनचे अध्यक्ष माझ्या स्वागतासाठी दोनदा बीजिंगच्या बाहेर आले, याचा भारताला अभिमान वाटतो,’ असे मोदींनी म्हटले. तसेच चीनच्या अध्यक्षांनी दोनवेळा बीजिंगबाहेर येऊन माझं स्वागत केले, असे स्वागत होणारा मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची वुहान प्रांतातील इस्ट लेक येथील अतिशय नयनरम्य अतिथीगृहात भेट झाली. यावेळी मोदी यांनी जिनपिंग यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले. ‘भारत आणि चीनवर जगातील 40 टक्के लोकसंख्येची जबाबदारी आहे,’ असेही मोदींनी यावेळी म्हटले. भारत आणि चीनने एकमेकांना सहकार्य करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मोदींच्या या आवाहनाला चीनच्या अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘जगाच्या विकासात चीन आणि भारताने महत्त्वाचे योगदान देण्याची आवश्यकता आहे,’ असे जिनपिंग यांनी म्हटले.  या भेटीत मोदींनी चीनच्या अध्यक्षांचं तोंडभरुन कौतुक केले. ‘अनौपचारिक भेटीचं आयोजन करुन चीननं चर्चेसाठी अतिशय पूरक वातावरण तयार केलंय. जिनपिंग यांनी उचललेलं हे पाऊल अतिशय स्तुत्य आहे,’ असे मोदींनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले हिंदी चिनी भाईभाई च्या नाऱ्या बरोबरच पंचशील सूत्र मान्य केल्यावर नेहरू ह्यांना रडावे लागले व असे रडणारे पंतप्रधान हे ह्या देशाचे एकमेव नेते होत ह्याचीच पुरावृत्ती मोदीच्या बाबतीत न व्होवो म्हणजे मिळवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)