चीनमधील हॉटेलच्या आगीत 18 जणांचा मृत्यू

बीजिंग – चीनच्या ईशान्येकडील हेर्बिन शहरातल्या रिसॉर्ट हॉटेलला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीमध्ये किमान 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला. हर्बिनमधील सन आयलॅन्डमधील बिलोंग हॉट स्प्रिंग या रिसॉर्ट हॉटेलला पहाटेच्या सुमारास ही आग लागली. जखमींचा नेमका तपशील मिळू शकलेला नाही, असे या हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. ही आग लागण्याचे नेमक्‍या कारणाचा तपास केला जात आहे.

चीनमध्ये गेल्या दोन दशकांपासून सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हॉटेल, शॉपिंग मॉल आणि अपार्टमेंट इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत करण्यासाठी सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाने विशेष प्रयत्न केले आहेत. मात्र तरिही ही मोठी दुर्घटना घडली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोव्हेंबर महिन्यात चुकीच्या वायरिंगमुळे लागलेल्या आगीत होरपळून 19 जणांचा मृत्यू झाला होता. 2010 मध्ये शांघायमधील एका टॉवरला लागलेल्या आगीत 58 जणांचा मृत्यू झाला होता. वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)