बीजिंग (चीन) – चीनच्या वन बेल्ट वन रोडबाबत भारताने आपली खंबीर भूमिका कायम ठेवली आहे. भारत या प्रकल्पात सहभागी होणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी एससीओ (शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत हे लक्षात घेता भारताची ही भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
चीनचा वन बेल्ट वन रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे जुन्या सिल्क रोडचा आधुनिक अवतार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एशिया आणि त्याच्या पुढील देशांना एका पायाभूत सुविधेने जोडण्याचे काम करणार आहे. या प्रकल्पाच्या एका महत्त्वपूर्ण भागासाठी भारताची सहमती अगदी आवश्यक आहे. मात्र, भारताने यावर सही केलेली नाही.
या प्रकल्पांतर्गत चीनपासून पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंतचा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जातो
एसीओ बैठकीत चीनने भारताचे मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण भारत आपल्या खंबीर भूमिकेवर कायम राहिला आहे. कझाखस्तान, किर्गिजस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकस्तान आणि उझबकिस्तान यांनी वन बेल्ट वन रोड प्रकल्पाचे समर्थन केल्याचे बैठकीनंतर एका निवेदनात जाहीर करण्यात आले, परंतु भारताने नकार दिल्याची माहिती मात्र देण्यात आली नाही.
वन बेल्ट वन रोडचा मुद्दा शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या शिखर बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा