चिनी नागरिकाला हेरगिरीच्या आरोपावरून अमेरिकेत अटक

शिकागो (अमेरिका) – एका चिनी नागरिकाला हेरगिरीच्या आरोपावरून अमेरिकेत, शिकागो येथे अटक करण्यात आली आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेला हा चिनी नागरिक विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत राहत आहे. इलेक्‍ट्रिकल इंजिनीयरिंगच्या अभ्यासासाठी 2013 मध्ये अमेरिकेत आलेल्या या चिनी नागरिकाचे नाव चाओकुन (27) असे आहे.

अमेरिकन शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्सची भरती करण्यासाठी चीनला मदत करण्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. आठ अमेरिकन शास्त्रज्ञ आणि इंजिनीयर्सची माहिती जमा करून त्यांना चीनमध्ये पाठवण्याची जबाबदारी चिनी गुप्तचर संस्थेने चाओकुनवर सोपवली होती, असे सांगण्यात आले आहे. या आठजणांमध्ये काही सुरक्षा ठेकेदारांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तो अमेरिकेच्या ऍटर्नी जनरलना कोणतीही माहिती न कळवता तेथे राहत होता, व परदेशी सरकारचा एजंट म्हणून काम करत होता.ज्या आठ अमेरिकन नागरिकांची माहिती चाओकून जमा करत होता. ते मूलत: चीन आणि तैवानचे नागरिक होते, त्यांना नंतर अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)