चिदंबरम यांना पुन्हा तात्पुरता दिलासा

1 ऑगस्ट पर्यंत अटक टळली
नवी दिल्ली – आयएनएक्‍स मिडीया मनिलॉंड्रिग प्रकरणात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता त्यावर निकाल देताना हायकोर्टाने त्यांना 1 ऑगस्टपर्यंत अटक करण्यास मनाई केली आहे. न्यायालयाची परवानगी न घेता देश सोडून जाऊ नये आणि ईडीला पुर्ण सहकार्य करावे अशा अटींसह त्यांना हा दिलासा मिळाला आहे.

आपल्या अटकेची भीती असल्याने त्यापासून आपल्याला संरक्षण मिळावे अशीा मागणी चिदंबरम यांनी कोर्टात केली होती त्यावर कोर्टाने ईडीचे मत मागवले आहे. 1 ऑगस्ट रोजी ईडी, सीबीआय यांच्याकडून येणाऱ्या प्रतिसादानंतर चिदंबरम यांच्या अटकपुर्व जामीनावर निर्णय घेतला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)