चित्रांगदा करणार दिव्यांग जलतरणपटूचा बायोपिक

“सूरमा’च्या निमित्ताने चित्रांगदा सिंह चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. “सूरमा’मध्ये तिने भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंहच्या जीवनावरची कथा आनली होती. 2006 मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान त्याला बंदुकीची गोळी लागली होती. मात्र त्यानंतर त्याने आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने हॉकीतील अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली.

आता चित्रांगदा आणखी एक प्रेरणादायी क्रीडा विषयक चित्रपट घेऊन येणार आहे. तिचा पुढील सिनेमा एका दिव्यांग जलतरणपटूशी संबंधित असणार आहे. ही जलतरणपटू दक्षिणेतील आहे. तिच्या बायोपिकसंदर्भात तिच्याशी चर्चा सुरू आहे. संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्‍यक असते, त्यामुळे बायोपिक बनवण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागू शकतो, असे या प्रोजेक्‍टशी संबंधित सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बायोपिक बनवण्यासाठी चित्रांगदा खूपच अनुकूल आहे. सत्यकथा या लोकांना सांगितल्या जायलाच पाहिजेत. जर त्या व्यवस्थित सांगितल्या गेल्या तर त्याचा परिणाम होतो, असे ती म्हणाली. चित्रांगदा यापूर्वी संजय दत्तचा लीड रोल असलेल्या “साहेब, बिबी और गुलाम 3’मध्ये दिसली होती. सैफ अली खानचा लीड रोल असलेल्या “बाजार’मध्येही ती दिसणार आहे. स्टॉक मार्केटशी संबंधित या सिनेमामध्ये सैफ एका गुजराती उद्योगपतीच्या रोलमध्ये असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)