चिखली ते कळस रस्ता दुरुस्तीसाठी “रास्ता रोको’चा इशारा

संग्रहित छायाचित्र

संगमनेर – कोल्हार -घोटी राज्यमार्ग हा खड्डेमय झाला असून संगमनेर व अकोले तालुक्‍यांना जोडणाऱ्या या राज्यमार्गावरील चिखली ते कळस या दहा किलोमीटर अंतरावरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्ताचे काम आठ दिवसाच्या आत सुरु न झाल्यास दि. 5 ऑक्‍टोंबर रोजी चिखली फाटा येथे परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत “रास्ता- रोको’ आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संगमनेर शहरातून अकोले – भंडादऱ्याकडे जाणारा पुढे मुंबईला नेणारा कोल्हार – घोटी राज्यमार्गवर खड्ड्यातील गचक्‍यांनी अनेक प्रवाशांना पाठीचे विकार जडू लागले आहेत. अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले, परंतु परिणाम झाला नाही. या परिसरातील धांदरफळ येथील युवकांनी सातवा मैल परिसरात रस्त्यालगत फलक लावून निषेध नोंदविला आहे. कोल्हार-घोटी रस्त्यावर विशेषत: संगमनेरच्या पश्‍चिमेला अकोल्याच्या दिशेने निघाले की चिखली ते कळस या दहा किलोमीटर दरम्यान दुचाकीस्वार तर जीव मुठीत धरून वाहन चालवत असतात. अनेकदा रस्त्यातील खड्डे चुकविण्यासाठी दुचाकीस्वाराला कसरत करावी लागते. खड्डे चुकविताना थोडेसे उजवीकडे वाहन अचानक नेले, तर पाठीमागून भरधाव वेगाने येणारे मोठे वाहन जवळून खेटून जाते. त्यामुळे दुचाकीस्वार होलपटतो. मोठ्या वाहनांमधून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या खड्ड्यांचा चांगलाच त्रास जाणवतो. वृद्ध प्रवाशांच्या पाठीच्या व कमरेच्या तक्रारी दिसून येतात.
रात्री पडलेल्या पावसामुळे खड्डे पाण्याने भरलेले आहेत.त्यामुळे वाहन चालविताना अंदाज येत नाही. गतीने वाहन खड्ड्यात आदळते तेव्हा सर्वच प्रवाशांच्या अंगाला झटके बसतात. दुचाकीस्वारांना तर पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमधून वाट शोधणे इतके सहज शक्‍य होत नाही. या खड्ड्यांमधील दणक्‍यामुंळे वाहनांचे नुकसान होत आहे.
मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या कोल्हार -घोटी राज्यमार्गावर चिखली ते कळस या दहा किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम आठ दिवसाच्या आत सुरु न झाल्यास दि. 5 ऑक्‍टोंबर रोजी चिखली फाटा येथे परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत “रास्ता रोको’ करण्यात येणार असल्याचे कातोरे यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)