चिखलीला मिळाले पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक

पिंपरी – चिखली पोलीस ठाणे लवकरच सुरु होणार असून यासाठी पहिले वरीष्ठ पोलीस निरीक्षकही पोलीस प्रशासनाने नियुक्त केले आहेत. हा मान निगडीचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांना मिळाला आहे.

चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी या परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने गुरुवारी (दि. 26) दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून शंकर आवताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शंकर आवताडे चिखली पोलीस ठाण्याचे पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिखली पोलीस ठाण्यात निगडी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग देण्यात येणार असून या दोन पोलीस ठाण्यांमधून आणि पोलीस मुख्यालयाकडून फौजफाट्याची गरज भागवली जाणार आहे. शासकीय पातळीवर पोलीस ठाण्यास मान्यता मिळाली असून चिखली येथील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत हे नवीन पोलीस ठाणे सुरू होण्याची शक्‍यता आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
प्रमोद वाघमारे – नियंत्रण कक्ष ते शिवाजीनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे)
विठ्ठल दरेकर – शिवाजीनगर पोलीस ठाणे (गुन्हे) ते चंदननगर पोलीस ठाणे (गुन्हे)
दीपाली धाडगे – पुणे मनपा अतिक्रमण विभाग ते नियंत्रण कक्ष
सतिश डहाळे – पुणे मनपा अतिक्रमण विभाग ते उत्तमनगर पोलीस ठाणे (गुन्हे)
विवेक मुगळीकर – गुन्हे शाखा ते पिंपरी-चिंचवड मनपा अतिक्रमण विभाग
विजय पुराणिक – गुन्हे शाखा ते सहकारनगर पोलीस ठाणे (गुन्हे)
शंकर अवताडे – निगडी पोलीस ठाणे (गुन्हे) ते चिखली पोलीस ठाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
सुनील ताकवले – सहकारनगर पोलीस ठाणे (गुन्हे) ते विशेष शाखा
विश्वास थोरात – गुन्हे शाखा ते नियंत्रण कक्ष
अशोक सायकर – उत्तमनगर पोलीस ठाणे (गुन्हे) ते विश्रांतवाडी पोलीस ठाणे (गुन्हे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)