चिखलीत तरुणावर वार

पिंपरी – धक्का लागल्याच्या कारणावरून एकाने तरुणाला मारहाण करीत त्याच्यावर वार केले. ही घटना चिखली येथे घडली.तरुण गुंडे (रा. चिखली. पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मंगलराम वासुदेव वर्मा (वय-45, रा. नंदनवन हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी गुरुवारी (दि.31) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुंडे हा फिर्यादी वर्मा यांच्या तोंडओळखीचा आहे. मंगळवारी (दि.29) फिर्यादी यांचा मुलगा अंकित याचा धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपीने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच धारदार वस्तूने अंकितवर वार करीत त्यास जखमी केले. सहायक निरीक्षक नीलेश जगदाळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.