चिंबळी, माजगावमधील रस्त्यांची दुरवस्था

चिंबळी-खेड तालुक्‍यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी (ता. खेड) येथील हनुमान मंदिर ते बर्गेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपर्यंत तसेच आळंदी रोड ते माजगांवफाटा ते माजगांवपर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पायी चालण्यापासुन चारचाकी वाहन चालविणे मोठे अवघड झाले असल्याने या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या भागात औद्योगिक क्षेत्र असल्याने जडणघडण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मालवाहू गाड्यांची रात्र दिवस वर्दळ वाढली आहे. या रस्त्याची अवस्था फार बिकट झाली असून येत्या पंधरा दिवसांत शाळा सुरू होणार असल्याने या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जाणे-येणे मोठे कसरतीचे होणार आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदरच या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्याप्रमाणे चिंबळीफाटा ते चिंबळीगांव जाणाऱ्या रस्त्यावर एका ठिकाणी असलेल्या चढणीवर दोन्ही बाजूने रस्ता खचून खड्डे पडले आहेत. चाऱ्या बुजत चालल्याने वाहन चालविणे व पायी चालणे मोठे अवघड झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)