चिंबळी परिसरात 655 लाभार्थ्यांनी अर्ज दाखल

चिंबळी- खेड तालुक्‍यात सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत चिंबळी परिसरात तीन दिवसांत 655 लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती चिंबळीचे तलाठी बी. बी. पाटील यांनी दिली. यात चिंबळी येथे 80, कुरुळी 75, केळगाव 50, मरकळ 350 तर निघोजे येथे 100 शेतकरी वर्गाने अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, अद्यापही अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.