चिंबळी परिसरात सोयाबीन पिकावर कीड

चिंबळी- सतत पडत असलेल्या भीज पावसाने आणि ढगाळ वातावरणातील बदलामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याचबरोबर गवताचे बारीकसारीक तण उगवल्याने चिंबळी परिसरात औषध फवारणी करण्यात शेतकरी मग्न झाले आहेत. खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगांव, माजगांव, मरकळ, सोळू, धानोरे आदी भागांतील शेतकरी वर्गाने एक महिन्यापूर्वी खरीप हंगामातील सोयाबीन, वाले, मुंगसे, उडीद, भुईमुगाची पेरणी केली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. या तणाच्या खुरापणीसाठी परिसरात शेतमजुरांची टंचाई जाणवत असल्याने तणनाशक फवारणी करण्यात शेतकरी मग्न झाला आहे. तणनाशके फवारणीसाठी एकावेळी दीड ते दोन हजार रुपये एकरी असा खर्च येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)