चिंबळीतून 20 वर्षीय तरूणी बेपत्ता

चिंबळी- चिंबळी (ता. खेड) येथून 20 वर्षीय तरूणी बेपत्ता झाली असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. बेपत्ता झाल्याची खबर शेखर रावजी लोखंड (वय 43) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली. अंकिता शेखर लोखंडे, असे बेपत्ता झालेल्या तरूणीचे नाव आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंबळी येथून दि. 30 मे रोजी घरातून कोणाला काही न सांगता तरूणी निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेऊन ही ठावठिकाणी लागला नसल्याने मुलीचे वडील शेखर लोखंडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तरूणीने नाव व वर्णन पुढील प्रमाणे उंची पाच फुट एक इंच चेहरा गोल नाक सरळ अंगात शेवाळी रंगाचा कुर्ता, लाल रंगाचा सलवार व ओढणी पायात पैंजण व चप्पल आहे. याबाबत कोणास काही माहिती असल्यास आळंदी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार पी. एन. बनकर करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.