चिंतेत भर!केरळमधील विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडणारे दोघे करोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया एक्‍स्प्रेसच्या विमानाचा भीषण अपघात झाला. दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्‍स्प्रेसचे विमान विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. या दुर्दैवी दुर्घटनेत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे धक्‍क्‍यात असलेल्या जखमींच्या नातेवाईकांसाठी आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमान अपघातात मरण पावलेल्या 18 प्रवाशांपैकी दोन जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

एअर इंडिया एक्‍स्प्रेस विमान अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी दोघे करोना पॉझिटिव्ह निघाल्याचे वृत्त एका इंग्रजी दिलं आहे. दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्‍स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर हे विमान रात्री 7.45 वाजता उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्डयात कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून 35 फुटी खड्डयात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले. यात भयंकर अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 22 जणांची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, या विमान अपघातानंतर चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी दोन जणांना करोनाची लागण झालेली होती. ही माहिती समोर आल्यानंतर विमान अपघातानंतर मदत कार्यात असलेल्या सर्वांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विमान अपघाताच्या घटनेचा तपास एअरक्राफ्ट ऍक्‍सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) करणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी तसे आदेश दिले आहेत. पुरी यांनी अपघातस्थळी जाऊन विमानाची पाहणी केली. त्याचबरोबर अपघाताबद्दल अधिकची माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.