चिंचवड देवस्थानच्या जमिनींसाठी आंदोलन

पिंपरी – महापालिका हद्दीतील वाकड भागातील चिंचवड देवस्थानच्या इनाम जमिनी भू-माफीयांनी हडप केल्याचा आरोप करत मोरया भक्‍तांनी धरणे आंदोलन केले.

चिंचवडगावातील मोरया गोसावी समाधी मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते शंतनू नांदगुडे, प्रमोद शिंदे, सागर देव, गणेश देव, अमोल उबाळे, मनिष वाघमारे, संदीप चव्हाण, भारत मिरपगारे, मारुती जाधव, संगिता शहा, रुहिनाज शेख, शबाना शेख, बालिका गुरव आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. गणपती बाप्पा मोरया, भूमाफियांवर कारवाई करा, भूखंड माफियांना शिक्षा झालीच पाहिजे, ट्रस्टची जमीन मिळालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी तसेच धर्मादाय आयुक्‍तांना याबाबत निवेदन देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार, वाकड (ता. मुळशी) या भागात इनाम वर्ग 2 आणि 6 मधील जमिनी वगळता इनाम वर्ग 3 मधील 1640 एकर जमीन चिंचवड देवस्थानच्या नावावर आहे. बॉम्बे ट्रस्ट ऍक्‍ट 1950 नुसार या जमिनीची नोंद अद्याप चिंचवड देवस्थान ट्रस्ट संस्थानच्या मालमत्तेत केलेली नाही. इनाम वर्ग 3 च्या जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार व टी.डी.आर. हस्तांतरण होवू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरसचिव प्रधान सचिव यांनाही पत्र देण्यात आले आहे. परंतु, इनाम वर्ग 3 जमिनीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे देवस्थानची जमिनी परत मिळावी, बेकायदेशीर मार्गाने जमीन हडप करणाऱ्या भूमाफियांना शिक्षा व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)