चिंचवड, दापोडीत अज्ञातांकडून दगडफेक

पिंपरी – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चिंचवडगाव येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. मात्र सोशल मिडियावरून पिंपरी-चिंचवड बंद असल्याची अफवा पसरल्याने चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात एका टोळक्‍याने दहा ते बारा दुकानांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. तर फुगेवाडी परिसरात बसवर दगडफेक करण्यात आली. यामुळे अघोषित बंदला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चिंचवडगावात श्रद्धांजली आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा शांततेत सुरु असताना चिंचवडच्या वाल्हेकरवाडी आणि गुरुद्वारा परिसरात एका टोळक्‍याने दहशत निर्माण करण्यासाठी दहा ते बारा दुकानांवर दगडफेक केली. त्यामध्ये एचडीएफसी बॅंकेच्या एमटीएम आणि नेहा मोटर्स कंपनीच्या शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हेच टोळके चिंचवडच्या विविध भागांमध्ये फिरून बंदसाठी व्यापाऱ्यांना दमदाटी करीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरीकडे फुगेवाडी परिसरामध्ये पीएमपीएमएलच्या (एमएच-12, एफसी-3343) या बसवरही दगडफेक करण्यात आली. मात्र, सुदैवाने यात कोणीही प्रवासी जखमी झालेला नाही. बंदचे सोशल मिडियावर फिरणारे मेसेजमुळे शहरात दिवसभर संभ्रमाचे वातावरण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)