चिंचवडमध्ये सव्वा तीन लाखांचा गांजा जप्त

पिंपरी – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत चिंचवड येथून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 16 किलो गांजा जप्त केला आहे. सव्वा तीन लाख रूपये किंमतीचा हा गांजा आहे.

प्रल्हाद सुनील माचरे (वय-21, रा. गांधीनगर झोपडपट्टी, जळगाव), संतोष बन्सी गुमाने (वय-38, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक संतोष दिघे यांना खबर मिळाली की, चिंचवड येथे दोघांजवळ मोठ्या प्रमाणात गांजा आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचत प्रल्हाद व संतोष यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 16 किलो 50 ग्रॅम वजनाचा तब्बल 3 लाख 23 हजार 270 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस हवालदार राजन महाडीक, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, रमेश भिसे, पोलीस नाईक संतोष दिघे, दिनकर भुजबळ, पोलीस शिपाई शैलेश मगर, दादा धस, संतोष भालेराव, प्रसाद जंगलीवाड, प्रदीप गुट्टे यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)