चिंचवडमध्ये “श्रमशक्‍ती पुरस्कारां’चे वितरण

चिंचवड – खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चिंचवड येथील ऑटोक्‍लस्टर सभागृहात श्रमशक्ती पुरस्काराचे वितरण खासदार बारणे आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक निलेश बारणे, ऍड. सचिन भोसले, कामगार नेते जयसिंग पोवार, मधुकर भोंडवे, नामदेव शेलार, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, माजी शिक्षण समिती सदस्य गजानन चिंचवडे आदी उपस्थित राहणार आहेत.

शहरामध्ये अनेक खासगी व व्यवसायिक कंपन्या आहेत. यामध्ये काम करणाऱ्या कामगार व अनेक श्रमिक संघटनांचे प्रमुख यांचा सन्मान कामगार दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. समीर धुमाळ, यशवंत भोसले, आशिष शिंदे, काशिनाथ नखाते, अशोक सातकर, निलेश काळोखे, दिलीप पवार, अनिल कवठेकर, संतोष कणसे, केशव घोळवे, सुनील लांडगे, गजेंद्र निंबाळकर, डॉ. वसंतराव भांदुर्गे, मनोजकुमार अनेकर, कैलास माळी, राकेश देशमुख, बाजीराव सातपुते यांचा सत्कारार्थींमध्ये समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)