चासकमानच्या कालव्यात झाडांचे साम्राज्य

केंदूर : करंदी (ता. शिरूर) या गावच्या हद्दीतून जाणाऱ्या चासकमानच्या कालव्यात झाडाझुडपांचे प्रमाण वाढले आहे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
करंदी गावच्या हद्दीतुन चासकमानचा कालवा गेल्याने परीसरातील शेतकऱ्यांना गेल्या 18 ते 20 वर्षांपासून चांगले दिवस आले आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कालव्याची डागडुजी केली नसल्याने कालव्याच्या आतल्या बाजूस झाडांचे प्रमाण वाढत आहे मोठी झाडे झाल्याने गेल्या आठवड्यात वादळी वार्यासह पाऊस झाला त्यावेळी काही मोठी झाडे ही कालव्यात उलटून पडली आहेत. अगोदरच कालव्यात असणाऱ्या झुडुपांमुळे पाणी अडले जात आहे आता तर झाडे उलटून पडल्याने आणखी पाणी तुंबू शकते पर्यायाने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. पिंपळे जगताप, वाजेवाडी, सणसवाडी अशा गावांना पोटचारीने पाणी सोडण्यासाठी करंदीच्या नोबल पोल्ट्री जवळ पाणी अडवण्यासाठी केटी आहे अशा प्रकारे पोटचार्यांना पाणी सोडताना पाठीमागे एक किलो मीटर अंतरावर पाणी तुंबले जाते त्यातच या झाडांमुळे आणखी पाणी तुंबणार आहे त्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो कालव्या लागत लोकवस्ती आहे याचा विचार करून याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.