चार संरक्षण मंत्री झाले पण राफेलचा तपशील मोदींशिवाय कोणालाच माहिती नाही

राहुल गांधी यांचा टोकदार आरोप
नवी दिल्ली – मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात चार संरक्षण मंत्री झाले पण फ्रांसबरोबर झालेल्या राफेल कराराबाबतचा तपशील मोदी सोडून अन्य कोणत्याच राफेल मंत्र्यांला माहिती नाही अशी टोकदार टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. संरक्षण मंत्र्यांचा उल्लेख त्यांनी राफेल मंत्री असा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की देशातील संरक्षण मंत्रीपद सतत बदलते ठेवण्यात आल्याने तेथे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा लाभ उठवत स्वत: मोदींनीच राफेल करार केला आणि त्यात मोठा घोटाळा झाला असा आरोपही त्यांनी केला आहे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर निर्मला सीतारामन, मनोहर पर्रिकर आणि दोन वेळा अरूण जेटली यांनी संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्या धांदलीत मोदींनी राफेलचा करार उरकून घेतल्याचे राहुल यांनी यावेळी सूचित केले. या कराराचा तपशील मोदी सोडून अन्य कोणालाच माहिती नसल्याचेही त्यांनी नमूद केले. आज ट्विटरवरून पुन्हा राफेलचा विषय उपस्थित करीत राहुल गांधी यांनी हा हल्ला चढवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विषयावरून राहुल गांधी यांनी अविश्‍वास ठरावावरील चर्चेच्यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली होती. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस या सदस्यांनी एकमेकांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव लोकसभेत सादर केले आहेत. पण कॉंग्रेसने हा विषय आता जोरदारपणे लाऊन धरला आहे. त्याकडे कानाडोळा करणे भाजपला अवघड करून टाकण्याची रणनिती आता कॉंग्रेसने आखलेली दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)