चार वर्षीय मुलीवर आमिषाने अत्याचार

जुन्नर- चार वर्षीय मुलीला आंबा खाण्यास देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. 20) घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अविनाश लक्ष्मण लगड (वय 26) याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अविनाश याने एका 4 वर्षीय मुलीस आंबा खाण्याकरिता देऊन, तिच्याशी गोड बोलून तिला घरातून उचलून जुन्नर बाजार समितीच्या प्रांगणामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये नेले व तिथे तिच्यावर दुपारच्या वेळी बलात्कार केला. या घटनेची फिर्याद जुन्नर पोलिसांकडे दाखल झाल्यानंतर जुन्नर पोलिसांनी तातडीने या तरुणाला अटक करून विशेष सत्र न्यायालय खेड येथे हजर केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल चव्हाण, पोलीस हवालदार अजीज मेस्त्री करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)