चारशे रुपयांनी घेतला दोघांचा बळी

पिंपरी – केजुबाई बंधारा येथे वाहून आलेल्या महिलेचा व तिच्यासह मित्राचा खून झाल्याचे उघड झाले आहे. उसन्या चारशे रुपयांसाठी खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोनाली संतोष वाकडे उर्फ मॅक्‍स (वय-33, रा. ओटास्कीम, निगडी) व सलमान शब्बीर शेख (वय-22, रा. देहुरोड) यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी रवी मानसिंग वाल्मिकी (वय-32, रा. देहुरोड), नागेश शिलामन चव्हाण (वय-23, रा. आकुर्डी), विशाल महिंद्र वाल्मिक (वय-25, रा. देहुरोड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सचिन चव्हाण व प्रशांत साळवी हे फरार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली ही 19 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. ती तिच्या एका मित्रासोबत घरातून गेली. त्यानंतर ती परतली नव्हती. त्यानंतर तिचा मृतदेह केजुबाई बंधाऱ्याजवळ पाण्यात आढळून आला. यावेळी सोनालीच्या भावाने हा घातपात असल्याची शंका वर्तवली होती. दरम्यान तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगुर्डे गावात सलमानचा मृतदेह आढळला. दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला असता ती तिच्या तीन मित्रांसह रिक्षात बसून सांगुर्डे या गावी गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी संशयीत रवी, नागेश व विशाल यांना ताब्यात घेतले व पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली.

तीन महिन्यापूर्वी रवी याने अमीरला पाचशे रुपये उसने दिले. अमीरने काही दिवसांनी केवळ 100 रुपये परत केले. मात्र उरलेले 400 रुपये परत देण्यासाठी अमीर व रवी यांच्यात बऱ्याचदा वाद झाले. यातून अमीरने त्याचा मित्र सलमान शेख याला बोलावून रवीला मारहाण केली. त्यानंतर सलमान याने रवीच्या घरी जाऊन शिवीगाळही केली. यातून अमीर व रवी यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. 19 जुलै रोजी रवीच्या लग्नाचा वाढदिवस होता. यासाठी रवीचे मित्र नागेश, विशाल हे रिक्षातून भक्ती-शक्ती चौकात आले यावेळी सोनाली, सलमान व प्रशांत हे हजर होते. यावेळी त्यांनी या तिघांनाही सोबत घेत तेथून एका बिअर शॉपीतून बिअरचा बॉक्‍स घेतला व सगळे सांगुर्डेच्या दिशेने गेले. मद्यपान केल्यानंतर रवी व त्याच्या मित्रांनी सलमानला मारहाण करण्यास सुरवात केली. सोनालीने त्यांना हटकले. त्यांनी संतापून सुरुवातीला सलमानचा गळा दाबून खून केला व त्याचा मृतदेह सांगुर्डे गावात रस्त्याच्या कडेला टाकून दिला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सोनालीचाही गळा दाबून खून करुन तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)