चाबुकस्वार, जगताप, लांडगे आघाडीवर

पिंपरी – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पिंपरीतून शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मण जगताप तर भोसरीतून भाजपचे महेश लांडगे आघाडीवर आहेत.

बालेवाडी क्रीडा संकुलात मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. टपाली मतदान व पहिल्या फेरीअखेर गौतम चाबुकस्वार 2335 मतांनी पुढे आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे जगताप यांना जोरदार टक्कर देत असल्याचे पहायला मिळत आहे. दुसऱ्या फेरीअखेर जगताप यांना 12 हजार 229 तर कलाटे यांना 10 हजार 429 मते मिळाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.