चाफळ ग्रामपंचायतीत 7 लाखाची अफरातफर

राजकीय गोटात खळबळ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे चौकशीचे आदेश
चाफळ, दि. 11 (वार्ताहर) – राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजलेल्या तीर्थक्षेत्र चाफळ, ता. पाटण येथील ग्रामपंचायतीने लाखो रुपयाची अफरातफर केल्याचे सातारा जिल्हा परिषद लेखा परीक्षण तपासणी दरम्यान उघडकिस आले आहे. या अफरातफरची खातेनिहाय चौकशी करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंन्दे यांनी पाटणच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.