चाकण शिक्रापूर रस्त्यावर एकाचा मृत्यू

शिक्रापूर – येथील केवटेमळा येथे चाकण शिक्रापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात वाहनचालक फरार झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्रीच्या सुमारास घडली. तर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल आहे. बालाजी पांडुरंग गुडमे (रा. कलकावाडी, ता. कंधार, जि. नांदेड) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अमोल बापू नप्ते (रा. करंदी, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. बालाजी गुडमे मोटार सायकल (एमएच 14 जीजी 9974) वरुन शिक्रापूर-चाकण रस्त्याने निघाला होता, त्यावेळी समोरून आलेल्या अज्ञात टेम्पोचालकाने त्याला धडक देऊन निघून गेला. अपघात झाल्याचा आवाज आल्यानंतर नागरिक धावत आले व त्यांनी बालाजी गुडमे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता बालाजी यांचा मृत्यू झाल्यच् डॉक्‍टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय होले करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)