चाकणला शिवजयंती उत्साहात साजरी

चाकण- चाकण व परिसरात जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत विविध सेवाभावी संस्था, संघटना व कार्यकारी मंडळांनी शिवप्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत शिवजयंती उत्साहात साजरी केली. चाकण शहर शिवसेना, सकल मराठा समाज, विविध मंडळे, सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्षांच्या वतीने चाकण मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नाणेकरवाडी (ता. खेड) येथील शिवाजी चौकात श्री शिवछत्रपती मित्र मंडळाच्या विद्यमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चाकण येथील श्री शिवाजी विद्या मंदिर प्रशालेतील विविध मंडळांच्या वतीने शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवप्रेमींनी शिवनेरी किल्य्यावरून आणलेल्या शिवज्योतीचे चाकण व परिसरातील नागरिकांनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आणि काश्‍मीर मधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करून शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मनोहर वाडेकर, अशोक मांडेकर, चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, जीवन सोनवणे, प्रीतम परदेशी, वैभव परदेशी, भगवान मेदनकर, बाबाजी कौटकर, अनिल सोनवणे, साईनाथ घाटे, बब्बू शेख, रत्नेश वैरागे, मयूर वाडेकर, विशाल नायकवाडी, विकास नायकवाडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)