चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता

चाकण- राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झालेल्या जाळपोळीनंतर आज (मंगळवार) चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तसेच, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते तळ ठोकून आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यात आंदोलने सुरू असून त्यास हिंसक वळण लागले आहे. तर सोमवारी (दि. 30) चाकण येथे काढलेल्या मोर्चा व रास्तारोकोला हिंसक वळण लागले तर पोलिसांची कुमक तोडकी असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती. यावेळी शेकडोच्या जमावाने पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी व खासगी बस आणि पीएमपीच्या (शहर वाहतूक सेवा) सुमारे 25 बस आणि मालवाहू ट्रक, पोलिसांची वाहने, तसेच पोलीस चौकी जाळली. तर 100 ते 150 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, आज तणावपूर्ण शांततेत नागरिकांनी दैनंदिन कामकाज सुरू केले आहे. तर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून 25 पेक्षा अधिक वाहने संरक्षणासाठी ठेवली आहेत. सर्व महत्त्वाच्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक दुकाने अद्यापही बंद असले तरी दैनंदिन व्यवहार सुरळित सुरू आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

  • 500 पोलीस तैनात
    चाकण मधील वाहतूक आज सुरळीत झाली असून पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौक व आंबेठाण चौक, नगर परिषद समोर पोलिसांच्या एकूण 25 व्हॅन व राज्य राखीव दलाचे 500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)