चाकणमध्ये “खाकी’च लक्ष्य

चाकण- चाकणमधील हिंसेला मराठा आंदोलन हे तात्कालिक कारण होते. खरे कारण तर आपसातील मतभेद, जुने भांडणे, पोलिसांकडून दैनंदिन कामकाजात केलेल्या जाणिवपूर्वक चुका, जमिनीचे व्यवहारातील हस्तक्षेप, राजकिय लोकांच्या सांगण्यावरून दाखल केलेले गुन्हे याचा उद्रेक किंवा पोलिसांवरचा राग नेमका आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर आला आणि पोलिसांना जमावाने सळो की पळो करून सोडले. एवढेच काय ज्या भागात हिंसा करायची त्या भागातील सीसीटीव्ही फूटेजसाठी लावण्यात आलेले कॅमेरेही जमावाने फोडले. 50-100 शंभरच्या गटाने आंदोलक विविध भागात विभागून हल्ला केला जात होता. एकंदर भाड्याने आणलेल्या हल्लेखोरांप्रमाणेच हिंसक आंदोलन घडवून आणण्यात आल्याची चर्चा कालपासून चाकणमध्ये परिसरत रंगली आहे.
हिंसक घटनेत औद्योगिक वाहने आणि एसटीला मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यात आले. यामुळे एसटीचे नुकसान झालेच मात्र औद्योगिक व्यवहारावरही परिणाम जाणविला. नाशिक महामार्ग गेल्या काही वर्षात अनेक कारणांसाठी अडविण्यात आला. यामुळे औद्योगिक क्षेत्रात चुकिचा संदेश जाण्याची शक्‍यता आहे. भविष्यात औद्योगिक शहर म्हणून नावाजलेल्या चाकण शहराची ओळख पुसू नये यासाठी पोलिसच, राजकिय आणि स्थानिक लोकांनी आंदोलने करताना तारतम्य भाव ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा राजकिय लाभ करून घेणाऱ्यांच्या मागे जाताना आपली स्वताची हक्काची रोजरोटी कधी बंद होईल याचा नेम नाही.

  • अन्‌ बाकीच्यांनी केले अनुकाण
    चाकणमधे मराठा आंदोलनाच्या सभेतच खरी हिंसाचाराची सुरूवात झाली होती. मात्र सभा संपल्यानंतर जमाव उठायला लागला. यावेळी एक महिला कार्यकर्ती म्हणाली की, थांबा इथेच लगेच कुठे चालले असे वक्तव्य केले आणि जमाव पुन्हा थांबला. दुसरीकडे एका समाजकंटकाने रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीवर दगड भिरकवला अन्‌ बाकी समाजकंटकांनी त्याचे अनुकरण केले. एकेक करता नाशिक महामार्गावरिल अनेक एसटी, बसेस, मालवाहू अवजड वाहनांची जाळपोळ सुरू झाली. पोलिसांच्या गाड्यांही जाळपोळीतून वाचल्या नाहीत. तर मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ शुटिंग काढणाऱ्यांनाही मारले जात होते.
  • समाजकंटक नक्की कोण?
    चाकण येथे मराठा आंदोलनादरम्यान समाजकंटाकांच्या हल्ल्यात खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, देहूरोडचे पोलीस उपअधीक्षक जी. एस. माडगूळकर किरकोळ तर चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, हवालदर अजय भापकर हे गंभीर तर 10 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर अनेक सामान्य नागरिकांनाही मारहाण केली आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी झालेले ते समाजकंटक नक्की कोण? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)