चांगल्या कामाची समाज दखल घेतो : प्रदिप विधाते

भुरकवडी : हणमंतराव देशमुख यांचा सत्कार करताना अनिल वडनरे, प्रा. बंडा गोडसे, प्रदिप विधाते व इतर. (छाया : प्रकाश राजेघाटगे)

पुसेगाव, दि. 5 (वार्ताहर) – आजकाल वेगवेगळ्या कारणाने प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. मात्र स्पर्धेच्या युगातही माणुसकीच्या भावनेने केलेल्या चांगल्या कामाची समाजाकडून योग्य दखल घेतली जाते, असे मत जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदिप विधाते यांनी व्यक्त केले.
भुरकवडी, ता. खटाव) येथे आयोजित गुणवंतांचा गुणगौरव स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. बंडा गोडसे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक देशमुख, हणमंतराव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे, बाजार समितीचे संचालक विजय काळे, अंकुशराव दबडे, किशोर डंगारे, तुकाराम देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. गोडसे म्हणाले, पदावर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीने समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने काम करावे. यात्रेनिमित्त स्नेहमेळावा व गुणीजनांचा गौरव करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कुरोली येथील सिध्देश्वर शिक्षण संस्थेच्या सचिवपदी हणमंतराव देशमुख यांची निविड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस अधिकारी वडनेरे, धनंजय क्षीरसागर यांचीही भाषणे झाली. तुळजाभवानी देवस्थानचे अध्यक्ष शरद कदम, माजी सरपंच शिवाजीराव कदम यांनी स्वागत केले. आयाज मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. दबडे यांनी सुत्रसंचालन केले. वाकेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव फडतरे, डॉ. राजेंद्र फडतरे, हिंदुराव फडतरे, राजाराम देशमुख, किसनराव जाधव, किरण जाधव, गोरख फडतरे, आनंदराव राऊत, अनिल राऊत, रमेश फडतरे, अनिरुध्द लावंगरे, अशोक कांबळे, सचिन फडतरे, सुरज भांडवलकर, नितीन जगदाळे, ऋषीकेश फडतरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)