चव्हाणवाडीतील ऐतिहासिक शिवकालीन विहीरीची पडझड

चव्हाणवाडी : शिवकालीन विहीरीची झालेली दुरवस्था. (छाया : सुरेश भोईटे)

दुरुस्तीचा प्रस्ताव वर्ष झाले तरी तहसील कार्यालयात धूळखात

अजय माळवे
फलटण, दि. 30 – चव्हाणवाडी, ता. फलटण येथील दत्त मंदिराजवळ असलेली ऐतिहासिक, शिवकालीन, पुरातन, कोरीव दगडाने बांधलेल्या विहीरीचे पुर्व बाजुचे बांधकाम ढासळले आहे. दत्त मंदिराजवळून जाणारा ये जा करणेचा रहदारीचा रस्तासुद्धा खचला असून बंद पडण्याच्या स्थितीत आहे. यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्‍यताही आहे. त्यामुळे तातडीने ही शिवकालीन विहीर दुरुस्त करण्याची गरज आहे.
फलटण ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची सासूरवाडी समजली जाते. छ. शिवराय मावळ्यांसह फलटणमार्गे प्रतापगडाकडे जात होते. त्यावेळी घोड्यांना सहजगत्या तहान भागवता यावी, यासाठी या मार्गावर काही ठरावीक अंतरावर भल्या मोठ्या विहीरी खोदल्या होत्या. तशीच एक विहीर चव्हाणवाडी गावातही बांधली होती. त्या सर्व विहीरींचे बांधकाम कोरीव दगडाने केलेले होते. पायऱ्यांची लांबी-रूंदी भली मोठी असल्याने घोडे सहजरित्या पाणी पिण्यासाठी विहीरीत उतरुन पाणी पित होते. गावातील लोकांनाही या विहिरीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नचं निर्माण त्याकाळी होत नव्हता.अजुनही विहीरीचे पाणी आजुबाजुचे लोक वापरत आहेत. पाणी खोलवर गेले तरं रहाटाच्या सहाय्याने पाणी काढले जात होते. अजुनही तो रहाट जशाचा तसा आहे. लोखंडी चक्रही सुस्थितीत आहे. कोरीव दगडाने शंभू महादेवाच्या पिंडीच्या आकाराची पूर्ण विहीरीचे बांधकाम, विहीरीच्या भल्या मोठ्या बांधलेल्या दगडी कमानी, दगडी पायऱ्या, पाहण्यासाठी लोक परिसरातून येत आहेत. ग्रामस्थांनी विहीर दुरुस्तीसाठी प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालयाकडे सादर केला आहे. मात्र विहीर अजुनही दुरुस्त न झाली नाही.
चव्हाणवाडी ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. आजही गावात आलेला नवीन पाहुणा शंभू महादेवाच्या आकाराची पिंडीसारखी कोरीव दगडाची विहीर दाखवा, अशी इच्छा व्यक्त करतात. हा ऐतिहासिक ठेवा जपण्याची गरज आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने सबंधीत कामाचा पाठपुरावा करुन ही पुरातन शिवकालीन विहीर ढासळण्याअगोदरच लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विहीरीचा पंचनामा केला गेला असून ग्रामपंचायतीमार्फत आम्ही विहीर दुरुस्तीचा प्रस्ताव तहसिल कार्यालयात सादर करून एक वर्ष झाले आहे.
डी. के. खराडे,
गावकामगार तलाठी

शिवकालीन विहीरीची वेळीच दुरुस्ती केली गेली नाही तरं ती पुर्ण ढासळणार आहे. पंचायतीमार्फत तहसिल कार्यालयात दिलेला दुरुस्तीचा प्रस्ताव वर्ष झाले धुळ खात पडुन आहे. वेळीच सबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन विहीर दुरुस्त करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर ऊतरावे लागेल
रविंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, चव्हाणवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)