#चर्चेतील चेहरे: जाणून घ्या…’माल्कम टर्नबुल’ यांच्याबद्दल  

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी माल्कम टर्नबुल यांच्या जागेवर नवीन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची नियुक्‍ती झाली आहे. ऑस्ट्रेलियातील सत्तारुढ लिबरल पार्टीमध्ये तीव्र मतभेदांनंतर टर्नबुल यांच्या जागेवर नवीन पंतप्रधान नियुक्‍त करण्यासाठी झालेल्या मतदानामध्ये माजी वित्त मंत्री मॉरिसन यांना 45 मते मिळाली. गृह मंत्री पीटर डटन यांना 40 मते मिळाली. टर्नबुल यांना अतिशय अपमानास्पदरितीने पंतप्रधानपद सोडायला लागले.
अत्यंत श्रीमंत घराण्यातील टर्नबुल यांनी 2004 मध्ये सिडनीमधून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. थोडा काळ हेवॉर्ड यांच्या आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी वित्त मंत्री म्हणूनही काम बघितले. 2007 मध्ये लेबर पार्टीच्या हेवॉर्ड यांच्या पराभवानंतर लिबरल पार्टीचे तिसऱ्या क्रमांकाचे नेते ते बनले. 2009 मध्ये त्यांनी पक्षांतर्गत बंडाळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र टोनी ऍबोट यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2015 साली ऍबोट यांच्याविरोधात बंडखोरी करून त्यांनी सत्तारुढ पक्षाची सगळी सूत्रे हाती घेतली होती आणि पंतप्रधानपदही मिळवले होते.
मात्र बंडखोरीचा सूड म्हणून पुन्हा त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्याच पक्षातून आव्हन दिले गेल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. याशिवाय बहुतेक खासदारांनी मतपत्रिकांद्वारे मतदान करून नवीन नेतृत्व निवडण्याची मागणी केली होती. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतांमध्ये फेरफार केला जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊनही मागणी केली गेली होती. टर्नबुल यांना एका आठवड्यात दोन वेळेस त्यांच्याच पक्षातून आव्हान दिले गेले होते. मंगळवारी त्यांच्या विरोधात झालेल्या पक्षांतर्गत मतदानामध्ये टर्नबुल यांना 48 विरुद्ध 35 असा निसटता विजय मिळाला होता.
मात्र दोनच दिवसात अर्थ मंत्री मॅथियास कोर्नमन यांनी इतर दोन मंत्र्यांबरोबर टर्नबुल यांना सहकार्य न करण्याचा पवित्रा घेतल्याने टर्नबुल यांना हटवण्यासाठी पुन्हा मतदान झाले. या सगळ्या घडामोडींमुळे ऑस्ट्रेलियात अराजक स्थिती निर्माण होण्याची वेळ निर्माण झाली होती. विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात रान उठवले जायला लागले होते. जॉन हॅवॉर्ड यांच 2007 मध्ये पराभव झाल्यापासून ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही पंतप्रधानाला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.
अंतर्गत दुही आणि विरोधी लेबर पक्षाकडून सातत्याने अडथळे आणले गेल्यामुळे कोणतेही सरकार स्थिर राहू शकलेले नाही. यावेळी ऑस्ट्रेलियातील सरकारबदलाला अमेरिका कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ट्रम्प आणि टर्नबुल यांच्यात शरणार्थींच्या मुद्दयावरून मतभेद झाले होते. ओबामा आणि टर्नबुल यांच्यातील रेफ्युजी विषयक करार ट्रम्प यांनी फेटाळला. त्यानंतरच सत्तारुढ पक्षामध्ये टर्नबुल यांच्याविरोधात बंडखोरीला सुरुवात झाली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)