चर्चा ‘युती’ची पण, तयारी ‘स्वबळाची’!

संग्रहित छायाचित्र

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात बैठक


बारामती, शिरूर मतदारसंघाचाही आढावा

पुणे – “स्वबळावर लढा’ असा नारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या आधीच दिला आहे. आता हाच नारा आता ते पुणे जिल्ह्यातही देणार आहेत. पुणे जिल्ह्यातेल तीन प्रमुख मतदार संघातील भाजपच्या बुथप्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांचा मेळावा शनिवारी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असून, त्यात शहा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात पुणे शहरासह बारामती आणि शिरूर येथील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याला आता महिनाभरच राहिला आहे. पुणे शहरातील लोकसभेची जागा सध्या भाजपकडे आहेच परंतु उर्वरीत तीन जागांपैकी दोन शिवसेनेकडे आणि एक राष्ट्रवादी कॉंग्रसकडे आहे. सध्या भाजपने युतीचा नारा न देता “स्वबळावर’ लढण्याचा नारा दिला आहे. युतीबाबतची चर्चा सुरू आहे, परंतु नऊ तारखेपर्यंत त्याबाबत निश्‍चिती होणार नाही. या पार्श्‍वभूमीवर शहा कार्यकर्त्यांना कसे बळ देतील, कोणती भूमिका मांडतील, याविषयीही उत्सुकता लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अस्रव जागांवरील तयारीच्या दृष्टीने बुथप्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. याबाबतची तयारी करण्याची जबाबदारी पालकमंत्री गिरीश बापट यांना दिली असून, त्याच्या तयारीसाठी बापट यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली.

युतीची बोलणी फिसकटली तर बारामती आणि शिरूर या दोन्ही जागांवर भाजपला उमेदवार द्यावे लागणार आहेत. त्यादृष्टीनेही ही चाचपणी असणार आहे. तसेच पक्षाच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)