चंद्रकांतदादांनी पुरावे द्यावे – संभाजीराजे छत्रपती

नवी दिल्ली – वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्या बड्या नेत्यांचे फोनवरील संभाषण आमच्या हाती लागले आहे, असा गौप्यस्फोट करणाऱ्या चंद्रकांतदादांनी ते उघड करुन सर्वांसमोर आणावे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

मला विश्वास आहे मराठा समाज अशा पद्धतीचे कृत्य कदापि करु शकणार नाही. साडेतीनशे वर्षे आम्ही हे कधी केले नाही. असली विकृत कल्पना मराठा करु शकत नाही. त्यामुळे सरकार खोटे बोलत नाही हे दाखवून देण्यासाठी चंद्रकांतदादांनी पुरावे द्यावेत, असे संभाजीराजे म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला मी एकटा जाणार नसून बंद दाराआड चर्चा करण्याऐवजी ही चर्चा खुल्या पद्धतीने व्हावी. कुणी एकट्याने जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटावे आणि चर्चा करावी या मताचा मी नाही. नेतेमंडळी काय बोलतात यावरुन समाजाच्या भावना ठरत नाहीत. आधीची आंदोलने ज्या पद्धतीने झालेली आहेत त्यामुळे बंद दाराआड चर्चेची भीती वाटते. आमची चर्चेची इच्छा आहे असे म्हणून केवळ चालणार नाही, प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला पाहिजे, असेही संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी तीन घटक महत्त्वाचे आहेत. यामध्ये राजकीय नेते, तज्ज्ञ आणि समाजातील घटक यांचा समावेश असावा आणि सर्वसमावेशक तोडगा काढावा, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)