चंदन तस्करांना पोलीस कोठडी

पिंपरी – कंटेनरमधून 16 कोटींच्या चंदनाची तस्करी करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी गुरूवारी मुद्देमालासह अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर. आरीवलगन (वय-30, रा. चेन्नई) व आदिल मेहमूद खान (वय-28, गोवंडी, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.

पुनावळे परिसरातून महामार्गावरून रक्तचंदन तस्करी होत असल्याच्या माहितीवरून वाकड पोलिसांनी गुरूवारी कंटेनर पकडला. त्यामध्ये तब्बल 16 कोटी रूपयांचे 16 टन रक्तचंदन हस्तगत करण्यात आले. कंटेनर चालक आरीवलगन आणि मालक खानला अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले. तेव्हा 3 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)