घोरपडीत जवानाचा मृतदेह आढळला

पुणे, दि. 29- घोरपडीतील लोहमार्गालगत एका लष्करी जवानाचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. जवानाने आत्महत्या केली असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. लष्करी जवानाचा मृतदेह असल्याने पोलिसांनी याची खबर लष्कराला दिली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात लष्करी जवान घटनास्थळी दाखल झाले होते. यामुळे परिसरात खळबळ माजली होती. घोरपडी लोहमार्गालगत रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. रेल्वेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी पाहणी केल्यानंतर तेथे कुजलेल्या अवस्थतील एक मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी तेथे एका लष्करी जवानाचा मृतदेह असल्याचे आढळून आले. याप्रकरणाची तातडीने लष्करला माहिती देण्यात आली. त्यानंतर तेथे लष्करी जवान मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यांनी बघ्यांना घटनास्थळापासून दूर ठेवले. दरम्यान, लष्करी जवान मोठ्या संख्येने लोहमार्गावर आल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपाची चर्चा सुरु होती. मृत जवानाची ओळख अद्याप पटू शकली नाही. मात्र त्याने आत्महत्या केली असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)