घोडेगावात मोर्चा काढून सरकारचा निषेध

मंचर – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे ग्रामस्थांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. घोडेगाव बंदला बुधवारी (दि.25) शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, यावेळी विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चामध्ये माजी सभापती कैलासबुवा काळे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक राम काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास दरेकर, सरंपच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक युवराज काळे, आशुतोष काळे, तुकाराम काळे, मृणाल काळे, कॉंग्रेसचे नेते अशोक काळे, धनंजय कोकणे, प्रशांत काळे, नवनाथ काळे, वैभव काळे, लक्ष्मण काळे, वैभव मंडलिक, गणेश काळे, प्रतापराव काळे, वर्षा काळे, सतीश जाधव यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)