घोडगंगा कारखान्याचा शासनासोबत वीज खरेदी करार

न्हावरे – येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा शुक्रवारी (दि.27) शासनासोबत वीज खरेदी करार झाल्याने घोडगंगा कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पुढील काळात कोट्यावधी रुपयांचे होणारे नुकसान टळले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासन रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वीज प्रतीयुनिट 4.99 रुपये दराने खरेदी करणार असल्याचे अशोक पवार यांनी सांगितले. तसा करारही झाला आहे. मात्र, हा दर कमी असून, पूर्वी करार झालेल्या साखर कारखान्यांकडून शासनाने प्रतीयुनिट 6.24 रुपये दराने वीज खरेदी केली होती. त्यामुळे नवीन वीज खरेदी करार कमी दराने झाले असले तरी कारखाना आणि ऊस उत्पादकांचे होणारे नुकसान टळणार आहे.
शासनाच्या दिरंगाईमुळे सुमारे दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून पुणे जिल्ह्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील बारा साखर कारखान्यांचे शासनासोबत सहवीज निर्मिती खरेदी करार रखडले होते.
त्यासाठी देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला होता. तसेच नुकतीच मुख्यमंत्री आणि कारखाने यांच्यामध्ये सहवीज निर्मिती करार घडवून आणण्यासाठी यशस्वीरित्या मध्यस्थी घडवून आणली. त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील घोडगंगा साखर कारखान्यासह इतर साखर कारखान्यांचेही सहवीज निर्मिती करार पूर्ण झाले आहेत, असे माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना अशोक पवार म्हणाले, सहवीज निर्मिती प्रकल्पाचा वीज करार होणार म्हणून मागील दोन वर्षांपासून प्रकल्पाच्या चाचणीसाठी लागणारा प्रत्येक हंगामातील सुमारे पाच कोटी रुपयांचा बगॅस शिल्लक ठेवला होता. त्याचेही संपूर्ण नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज आणि त्यावरील आजपर्यंत भरलेले व्याज आणि प्रकल्प बंद असल्यामुळे कारखाना तसेच शेतकऱ्यांचे सुमारे 76 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रकल्प करार झाल्याने पुढील काळात प्रकल्प सुरु होणार असल्याचे समाधान आहे., से पवार यांनी शेवटी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)