घोटाळे टाळण्याची काळजी घ्यावी -अरुण जेटली

File photo..
अर्थमंत्री अरुण जेटली यांची सरकारी बॅंक प्रमुखांना सूचना 
नवी दिल्ली: सरकारने आणलेला दिवाळखोरी आणि नादारी कायदा, विमुद्रीकरण, वस्तू आणि सेवा कर तसेच डिजिटल व्यवहारांमुळे वित्तीय क्षमता आणि धोके यांचे मूल्यांकन अधिक अचूक झाले आहे. याचा वापर करून बॅंकांनी घोटाळे होणार नाहीत याची काळजी घ्यावी केंद्रीय वित्त अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्‍त केले.
त्यासोबतच वित्तीय समावेशनाचा कार्यक्रम जोरकसपणे राबवल्यामुळे देशाची एकात्मिक आर्थिक वृद्धी होते आहे असे ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या वार्षिक आढावा बैठकीत ते आज बोलत होते. या धोरणांमुळे विकासदर आठ टक्के कायम राहण्यात मदत होईल. या विकासामुळे सार्वजनिक बॅंकांची ताकदही वाढेल.
बुडित कर्जांची समस्या सोडवण्यासाठी लवाद यंत्रणेची क्षमता पुन्हा तपासून घ्यायला हवी. बॅंकांनी कर्जाच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्नामुळे या बॅंकांविषयी सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. दिवाळखोरी आणि नादारी कायद्यातल्या सुधारणांमुळे कर्ज बुडवणाऱ्यांविरोधात कारवाई करणे शक्‍य झाले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंकांनी सरकारच्या वित्तीय समावेशनात मोठे योगदान दिले आहे असे त्यांनी सांगितले. बॅंकांनी ग्राहकांचा विश्‍वास जिंकायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. त्याशिवाय जुन्या कर्जांची वसुली, घोटाळेबाजांवर कारवाई करून बॅंकांनी जनतेचा विश्‍वास राखायला हवा असे ते म्हणाले. बॅंकांमधून त्वरित आणि स्वच्छ व्यवहारातून कर्ज मिळू शकते हा विश्‍वास निर्माण होणे आवश्‍यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)