घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टवर बंदी घाला! – विखे-पाटील

मुंबई – औरंगाबाद शहरात दंगल भडकल्यानंतर बेकायदेशीर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून तलवारी, चाकू, कुकरी, गुप्तीसारखी घातक शस्त्रांच्या खरेदीचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. अशा घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच खेळणीच्या नावाखाली विविध भागातून शस्त्रांचे पार्सल मागविण्यात आले होते. फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी, चाकू, गुप्ती, कुकरी, जांबिया अशी सुमारे 28 शस्त्रांची खरेदी करण्यात आली होती. पोलिसांना वेळीच याचा सुगावा लागला व पुढचा अनर्थ टळला असला तरी अशा प्रकारे खुलेआम शस्त्र खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतील तर ते घातक आहे, असे विखे-पाटील म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चौकशी करा!
औरंगाबादमध्ये हा शस्त्रसाठा कशासाठी मागवण्यात आला होता? त्याचा दंगलीशी काही संबंध आहे का? शस्त्र खरेदीत आणखी कोण-कोण गुंतले आहेत? याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही विखे-पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)