घराणेशाही कॉंग्रेसला महागात पडते आहे – अरुण जेटली

नवी दिल्ली – घराणेशाही असलेले राजकीय पक्ष काही काळ पिढ्यांपर्यंत अस्तित्वात राहतात. मात्र नंतर काळाच्या ओघात समाप्त होतात. कॉंग्रेससारख्या जुन्या पक्षालाही घराणेशाहीची किंमत चुकवावी लागत आहे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका केली आहे. कॉंग्रेसमुळेच राजकीय पक्षांमधील घराणेशाही वाढीस लागली आहे, असेही ते म्हणाले. एका ब्लॉगवर प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये जेटली यांनी ही टीका केली आहे.

सध्या कॉंग्रेसचे नेते निराशावादी वक्‍तव्ये करत आहेत. “मी काय करू शकतो? ते काही ऐकत नाही. 24 मे पर्यंत वाट पहा. आमचे राजकारण त्यानंतरच सुरू होईल. आमच्या प्रचारात त्रुटी आहेत. अंकल सॅम (सॅम पित्रोदा) यांना त्याबाबत सांगितले आहे. 2024 ची तयारी करूया.’ असे कॉंग्रेसचे नेते बोलताना दिसत आहे. ही वक्‍तव्ये पक्षाचा ऱ्हास होण्याची चिन्हेच आहेत. घराणेशाही असलेल्या पक्षांमध्ये एक समान त्रुटी असते. जर पक्षाची सध्याची पिढी अधिक सक्षम आणि लोकभावनेला आवाहन करू शकणाऱ्या क्षमतेची असेल, तर घराणे त्यांना मागे ओढते. त्यामुळे मोठा विजय मिळत नाही. नव्या पिढीला मागे ओढण्यासाठीच प्रोत्साहन दिले जाते. मात्र सध्याच्या पिढीमध्ये हा करिष्मा, समजूतदारपणा आणि लोकप्रियताही नाही. त्यामुळेच घराण्याभोवतालच्या गर्दीमध्ये असमाधानाची भावना आहे, असे जेटली म्हणाले.

नेतृत्व लादल्यामुळे नेते मोठे होत नाहीत. मोठी क्षमता असलेल्यांना फारच कमी वाव आहे. अशा अधिक क्षमता असलेल्या नेत्यांपासून लादलेल्या नेतृत्वाला असुरक्षित वाटू लागत आहे. यामुळे पक्षपातीपणाची भीती, भ्रामक सशक्तपणा आणि आत्मपरिक्षण न केल्यामुळे आलेल्या मर्यादेत वाढ होते, असे जेटली यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.