घड्याळाकडे पहावे लागते…

भोरमध्ये आमदार थोपटे यांनी केले आवाहन

भोर- खरे तर मला बरेच काही बोलायचे होते. पण, वक्त्‌यांची संख्या वाढल्याने बोलावे म्हंटले तरी घड्याळाकडेच पहावे लागते. म्हणून जास्त बोलणार नाही. जास्त काही न बोलता आगोदरच्या सर्व वक्‍त्यांची भाषणे कॉपी पेस्ट करतो, असे सांगून आमदार संग्राम थोपटे यांनी आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

भोर येथील सह्याद्री मंगल कार्यालयाच्या सभागृहात खासदार सुप्रीया सुळे यांच्या प्रचार सभे निमित्त येथील उत्रौली-कारी गटातील मतदार बंधू भगिनींची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार थोपटे बोलत होते.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, ही निवडणूक सत्ता आणि असत्याच्या निकषावर होत असून आमची पिढी चौकीदार नव्हे तर मालक होणार असल्याचे सांगितले. निरव मोदी 10 हजार कोटी घेऊन पळून गेला होता तेव्हा मुंबईचा चौकीदार झोपला होता का? असा सवाल करुन फडणवीस सरकार हे फसवणूक सरकार असल्याची टिका सुळे यांनी केली. यावेळी राज्याचे माजी मंत्री शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जि.प.सदस्य रणजीत शिवतरे, श्रीधर किंद्रे, विक्रम खुटवड, शैलेश सोनवणे यांचीही भाषणे झाली. यावेळी व्यासपिठावर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे, भोरच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष सीमंत शेटे, उपसभापती श्रीधर किंद्रे, विक्रम खुटवड, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष महेश शिंदे, यशवंत डाळ, भालचंद्र जगताप, दमयंती जाधव, गितांजली शेटे, सर्व नगर सेविका, नगर सेवक उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.