“ग्रीन ऍण्ड क्‍लिन शिर्डी’ फाउंडेशनला

साईभक्‍ताकडून 200 ट्री गार्ड भेट
शिर्डी – येथील ग्रीन ऍण्ड क्‍लिन शिर्डी फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाच्या कार्याने प्रेरित होऊन हैदराबाद येथील साईभक्‍त गिरीश रेड्डी यांनी शनिवारी (दि.21) 200 ट्री गार्ड भेट दिले. रेड्डी यांचा फाउंडेशनच्या वतीने हॉटेल साईछत्र येथे सत्कार करण्यात आला.
शिर्डी येथील सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शहरात स्वच्छतेबरोबर पाच हजार रोपांचेरोपण करून ग्रीन शिर्डी करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे लक्ष वेधून घेत आहेत. साईभक्त गिरीश रेड्डी यांनी फाऊंडेशनच्या कार्याची दखल घेत 200 ट्री गार्ड भेट दिले. रेड्डी म्हणाले की, ग्रीन शिर्डी क्‍लिन शिर्डी अंतर्गत सुरू असलेले वृक्षारोपणाचे कार्य पाहून प्रभावित झालो. भविष्यात शिर्डीत वृक्ष चळवळीसाठी पुढाकार घेणार आहे. हैदराबाद परिसरातील 40 गावे दत्तक घेतली असून प्रत्येक गावात स्वच्छ पाण्यासाठी आरओ प्लांट बसविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रीन ऍण्ड क्‍लीन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पारख यांच्या हस्ते गिरीश रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरपंचायतचे ब्रॅन्ड ऍम्बेसेडर डॉ. जितेंद्र शेळके, विक्रम वेद, डॉ. धनंजय जगताप, अमोल कटके, किशोर बोरावके, प्रदीप बाफना, नितीन शिंदे, दिलीप जगताप आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)