ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिशा देण्याची गरज

सनदी लेखापाल सोपान गायकर

मंचर- भारतातील वाढते उद्योजकीय वातावरण यामुळे चार्टर्ड अकाऊटंट व कंपनी सचिव या क्षेत्रात व्यवसायिक दृष्ट्या अनेक संधी विद्यार्थ्यांना आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार आहे; परंतु त्यांना दिशा मिळत नसल्याने ते प्राविण्य दाखऊ शकत नाहीत. त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मार्गदर्शनाची विद्यार्थ्यांना नितांत गरज आहे, असे मत पुणे येथील सनदी लेखापाल सोपान गायकर यांनी व्यक्त केले.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वतीने मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय येथे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी “वाणिज्य विभागातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. याबाबत व्याख्याते दुष्यंत जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले, शिवसेना तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, उपतालुकप्रमुख अजीत चव्हाण, युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक सचिन बांगर, वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. बी. बी. कल्हापूरे, प्रा. अर्चना ढोबळे यांच्यासह वाणिज्य विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व्यावसायिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावेत, यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा स्वरुपाची मार्गदर्शन शिबिरे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक महाविद्यालयात आयोजित करणार असल्याची माहिती युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)