ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडाला

बैलगाडा शर्यत बंदीमुळे सहा वर्षांपासून यात्रा पडल्या ओस

चिंबळी- सध्या गावागावात यात्रा उत्सवाचा हंगाम सुरू आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने गावोगावच्या यात्रा ओस पडल्या आहेत. गावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या यात्रांमधून ग्रामीण भागातील खेंड्यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते मात्र, शर्यती बंद पडल्याने गाडा शौकीनांसह पाहुणे मंडळीनी यात्रांकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील गाव यात्रामंध्ये होणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला असून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा मोडला आहे.

यात्रांमधून तळागाळातील छोटे मोठे व्यावसायिक गावोगावी भटकंती करून आपला उदरनिर्वाह चालवितात. प्रत्येक गावात यात्रा कालावधीत गावामध्ये भेळवाले कलिगंड विक्रेते आईस कॅडी पाणीपुरी पाळणेवाले पानमसाला टेम्पोवाले हलगीवाले वाजंत्री लाऊडस्पीकर स्पीकर निवेदक लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने रसंवती आईस्क्रीम किराणा दुकानदार विधुतरोषनाई आदि व्यावसायिक गावागावातील यात्रावर अवलंबून व्यवसाय करीत असतात मात्र बैलगाडा शर्यत बंदीमुळे यात्राही ओस पडू लागल्या आहेत या सगळ्याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यवसायिकावर झाला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल मंदावली आहे अनेक व्यव्यवसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

खेडेगावातून नोकरी व्यवसायानिमित्त शहराकडे किंवा परगावी गेलेला यात्रेसाठी हमखास गावी येतात व गावातील यात्रेत सहभागी होऊन गावकऱ्यांमध्ये रमून जातो त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो. यात्रांमध्ये पारंपरिकपणे बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात विशेषतः उत्तर पुणे जिल्हात घाटातल्या बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात किंबहूना बैलगाडा शर्यती हेच यात्रांचे खरे आर्कषण ठरलेले आहे. या शर्यतीमुळेच यात्रेला खऱ्या अर्थाने गर्दी जमून शोभा येथे व यात्रेत एक वेगळाच प्रकारचा जोश निर्माण होतो. पंचक्रोशीतील तसेच आजूबाजूचे गावकरी शेतकरी पाहुणे-रावळे, हवसे -नवसे, बैलगाडा शौकीन कुठल्याही आमंत्रणाची वाट न बघता बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आवर्जुन घाटात हजेरी लावतात;परंतू बैलगाडा शर्यतीला बंदी असल्याने गावोगावी यात्रा ओस पडल्या आहे

  • बैल जेमतेम 5 मिनिटे धावतो
    बैलगाडा शर्यतीसाठी एक बैल हा सरासरी सहा वर्षे धावत असतो आणि एका वर्षांत किमान गावच्या यात्रा उत्सवातील बैलगाडा शर्यतीत धावला जातो. एका गावच्या यात्रेतील बैलगाडा शर्यतीचा विचार केल्यास बैल फक्‍त 15 ते 20 सेकंद धावला जातो. तर एका वर्षात शर्यतीचा बैल जेमतेम 5 मिनिटे धावला जातो आणि सहा वर्षांत जेमतेम 30 ते 40 मिनिटे हा बैल शर्यतीत धावला जातो. बैलगाडा शर्यतीसाठी धावणाऱ्या बैलाला वेगवेगळ्या खाद्याचा नियमित व वेळेवर खुराक दिला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे असे बैलगाडा शर्यतींचे बैल असतात ते स्वत:च्या मुलाप्रमाणे जपतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.